नमस्कार मित्रानो
ज्योतिषशास्त्रानुसार माणसांत असलेल्या गुणांची आणि अवगुणांची माहिती मिळवता येते. माणसाच्या आत काही गुण असतात आणि काही अवगुण देखील असतात. गुणांच्या जोरावर त्याला समाजात चांगले स्थान मिळते.
अवगुणांमुळे मात्र अनेकवेळा संकटांना सामोरे जावे लागते. मित्रानो पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा खास आहे यावर तुमचा विश्वास असेलच. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःमध्ये एक खासियत घेऊनच जन्माला येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशी आहेत आणि या 12 राशीं नुसार प्रत्येकामध्ये काही ना काही खास असते, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आणि काही दोष असतातच. व्यक्तींमधील या गुण आणि अवगुणांच्या आधारावरच ते जीवन जगत असतात.
ज्योतिषशास्त्रात अशा 3 राशींचे वर्णन केले गेले आहे ज्यांच्या अंगी बोलण्याची कला एकदम जबरदस्त असते. अगदी गंभीर गोष्टी सुद्धा सोप्या शब्दात सांगण्यात या राशीचे लोक पटाईत असतात.
या राशीच्या लोकांमध्ये बोलण्याची एक विशेष कला असते. यांना वेग वेगळ्या विषयांवर बोलायला आवडते. प्रत्येक गोष्टी बद्दल माहिती मिळवणे देखील यांना चांगल्या प्रकारे जमते. या राशीच्या लोकांना हरवणे वाटते तेवढे सोपे नसते. या राशीचे लोक आयुष्यात स्वतःच्या बळावर खूप पैसा कमावतात . चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
वृषभ रास
वृषभ राशी हि राशी चक्रातील दुसरी राशी असून या राशीचे बोध चिन्ह बैल आहे. बैल स्वभावाने अधिक मेहनती आणि खूप शक्तिशाली असतो. सामान्यतः तो शांत असतो , परंतु जेव्हा राग येतो तेव्हा तो उग्र रूप धारण करतो. अगदी असाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांमध्ये आढळतो.
ज्योतिषशास्त्रात वृषभ राशीला महत्त्वाची राशी मानली जाते. या राशीवर राहूचा अधिक प्रभाव दिसून येतो. वृषभ राशीमध्ये राहू शक्तिशाली मानला जातो. राहू हा गूढ ग्रह असल्याचे म्हटले जाते. जेव्हा राहू शुभ स्थितीत असतो तेव्हा या राशीचे लोक संवादात पारंगत ठरतात. यांना हरवणे सोपे नसते.
मिथुन रास
ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन हि राशीचक्रातली तिसरी राशी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशी हि वायू तत्वाची मानली जाते. मिथुन राशीचा स्वामी ग्रह हा बुध आहे. नवग्रहात बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो.
बुधाला वाणी आणि तर्काचा कारक मानला जातो. जन्मपत्रिकेत बुध ग्रह शुभ स्थितीत असतो तेव्हा अशी व्यक्ती संभाषणात पारंगत ठरते. त्यांना शब्दात पराभूत करणे कठीण असते. या राशीच्या लोकांना वकिली, लेखन इत्यादी क्षेत्रात विशेष यश मिळते. खोट्याचा तिरस्कार आणि खऱ्याचा जयजयकार करणारे या राशीचे लोक असतात.
कन्या रास
ज्योतिषशास्त्रानुसार कन्या हि राशीचक्रातली सहावी राशी आहे. कन्या राशीचे लोक प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. संभाषणाच्या बाबतीतही ते इतरांपेक्षा अधिक तर्क आणि सावध असतात.
कन्या राशीचे लोक बोलतांना शब्दांचा वापर खूप गांभीर्याने करतात. त्यांच्या बोलण्यात गोडवा आणि नम्रता दिसून येते. त्यांची विनोदबुद्धीही चांगली असते. या राशीचे लोक उत्तम वक्ते म्हणून योग्य ठरतात. यांचा पराभव करणे देखील सोपे नसते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.