स्वयंपाक घरातून या 3 वस्तू कधीच संपू देऊ नका… येईल मोठं संकट…

0
338

नमस्कार मित्रांनो,

आज आपण जी माहिती घेणार आहोत ती खास करून महिलांसाठी आहे. ज्या महिला घरात स्वयंपाक करतात. घरातल्या धन, धान्या कडे लक्ष देतात, म्हणजे घरातील वस्तू संपत आलेल्या आहेत, किंवा संपणार आहे याची महिलांना काळजी असते.

मित्रांनो आपल्या घरात, खास करून स्वयंपाक घरात अशा काही गोष्टी असतात, ज्या आपण कधीही संपू द्यायला नको. कारण या मध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो.

आपण आपल्या घरात पैसा, धन जमवून ठेवतो, साठवतो, ते कधीही संपू नये असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आपण तिजोरी मध्ये 1 रुपया किंवा अकरा रुपये कायमस्वरूपी ठेवतो. हे पैसे आपण खर्च करत नाही. कायमचे आपण ते ठेवून देतो.

यातच लक्ष्मीचा वास असतो, माता लक्ष्मी खेचली जाते. ते म्हणतात ना पैसा पैशाला खेचतो. अगदी त्याचप्रमाणे.

अगदी याच प्रमाणे स्वयंपाक घरात सुद्धा असतं. आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तूंमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यामुळे चुकूनही या वस्तू आपण संपू द्यायच्या नाहीत.

या वस्तू संपल्या तर अन्नपूर्णा देवी आपल्या घरातून निघून जाते. आपल्या घरात आर्थिक संकटं येतात. पैसा पुरत नाही, आर्थिक अडचणी येतात. आणि मग आपल्याला अन्नासाठी तरसावे लागतं.

त्यामुळे मित्रांनो स्वयंपाक घरातील या काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. आणि या वस्तू कधीही संपू देऊ नका. या वस्तू आपण संपू दिल्या नाहीत तर याचा लाभ आपल्यालाच होणार आहे.

चला तर जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

1) मीठ

मित्रांनो पहिली वस्तू आहे मीठ. मित्रांनो मिठा शिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. जेवणाला चव येण्यासाठी मीठ अत्यंत गरजेचे असतं. हे मीठ आपल्या स्वयंपाक घरातून कधीही संपू देऊ नका.

तुम्ही मीठ आणताना एक दोन पाकीट जास्तीचे आणून ठेवा. म्हणजे जेव्हा मीठ संपत आहे असं लक्षात येईल तसं तुम्ही ते पुन्हा भरून ठेऊ शकता. असं केल्याने तुमच्या घरातले मीठ कधीही संपणार नाही.

2) हळद

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे हळद. मित्रांनो आपण स्वयंपाक करताना हळदीचा वापर करतो. हळद पावडर वापरतो. अशी ही हळद आपण आपल्या स्वयंपाक घरातून कधीही संपू देऊ नका.

हळद ही प्रत्येक मंगल कार्य असो किंवा कोणतेही धार्मिक कार्य असो. प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. हळदीचा संबंध हा बृहस्पती ग्रहाशी आहे.

मित्रांनो त्यामुळे आपल्या स्वयंपाक घरातून हळद कधीही संपू देऊ नका.

3) तांदूळ

मित्रांनो तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ. तांदूळ असा घटक आहे जे प्रत्येकाच्या घरी असते. गरीब असो किंवा श्रीमंत असो. पप्रत्येकाच्या घरात तांदूळ असतं.

तांदळात देवी अन्नपूर्णा चा वास असतो. आपण अनेकदा पूजा करताना तांदूळ वापरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातून कधीही तांदूळ संपू देऊ नका.

मित्रांनो या 3 गोष्टी मीठ, हळद आणि तांदूळ या आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका. या संपल्या तर त्यांच्या मध्ये असणारा अन्नपूर्णा देवीचा वास सुद्धा संपेल आणि आपल्या घरात आर्थिक संकटं येऊ शकतात.

त्यामुळे या 3 वस्तू कधीच संपणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्या.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here