घोर अनर्थ होईल जर या ३ स्त्रियांनी केली तुळशीची पूजा.

0
98

नमस्कार मित्रानो

मित्रानो तुळशीचं झाड हे प्रत्येक हिंदू घरात असतेच. प्राचीन ग्रंथांमध्ये तुळशीच्या झाडाचे महत्व सांगितले आहे. तुळस ही पृथ्वीवरील सर्व वनस्पती मध्ये पवित्र वनस्पती आहे. तुळशीचे रोप कितीतरी प्रकारच्या आजारांचा नाश करणारे व सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे आहे.

तुळशीचे रोप घरात असल्यामुळे सुख , समृध्दी , ऐश्वर्य यांची प्राप्ती होते व घरातून रोग आणि आजार दूर राहतात. म्हणूनच प्राचीन ऋषीमुनी यांनी तुळशीची पूजा करण्याचे विधान केले आहे. रोज जर कोणी व्यक्ती तुळशीपत्र खात असेल तर ती व्यक्ती कितीतरी प्रकारच्या रोगापासून मुक्त राहते. तुळशी हि मनुष्याच्या स्वास्थाच्या दृष्टीकोनातून गुणकारी औषधी आहे.

विज्ञान पण या गोष्टीला मानते परंतु शास्त्रांमध्ये तुळशीच्या रोपाशी निगडित काही अशा मान्यता आहेत ज्या मान्यतांच आपण तुळशीचे झाड लावताना पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो तुळशीचे रोप आपण कोणत्याही बुधवारी लावू शकतो. तुळशीचं रोप लावण्यासाठी कार्तिक हा महिना सगळ्यात उत्तम आहे.

कार्तिक महिन्यात तुळशीच्या झाडाची पूजा केल्यामुळे सगळ्या मनोकामना पूर्ण होतात . तुळशीचे झाड घरातील अंगणाच्या मध्यभागी लावले पाहिजे. आपल्या झोपण्याच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे झाड तुम्ही लावू शकता.

सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालून त्याची पूजा केली पाहिजे. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावणे सगळ्यात उत्तम असते , त्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

धार्मिक मान्यते प्रमाणे तुमच्या बाबतीत काही विशेष नियम सांगितले गेले आहेत ते लक्षात ठेवल्यामुळे वाईट नशीब पण उजळून निघते. तुळशीची पाने नेहमी सकाळी तोडली पाहिजेत. रविवारी तुळशी समोर दिवा लावू नये. भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना तुळशीपत्र जरूर अर्पण करावे.

भगवान गणेश आणि माता दुर्गेला तुळस कधीही वाहू नये. तुळशीची पाने कधीही शिळी होत नाही म्हणून पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करतात. चंद्रग्रहणाच्या वेळी अन्ना मध्ये तुळशीची पाने ठेवली तर ग्रहणाचा त्या अन्नावर प्रभाव पडत नाही.

त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या व्यक्तीने तुळशीचे रोप किंवा झाड लावू नये व त्याची पूजा कोणत्या स्त्रिया करू शकत नाही याबाबत देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुळशीचे झाड बुधाचे प्रतिनिधित्व करते. ते भगवान कृष्णाचे एक स्वरूप मानले गेले आहे.

भगवान कृष्णाला तुळशी सगळ्यात प्रिय आहे. भगवान कृष्णांना कोणताही प्रसाद चढवताना तुळशी शिवाय ठेवला जात नाही. ज्या परिवारातील लोक भगवान श्रीकृष्णाला मानतात त्यांच्या घरात तुळशीचे रोप जरूर असले पाहिजे व त्यांनी तुळशीची पूजा अवश्य केली पाहिजे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

तुळशीला परम वैष्णव मानले गेले आहे , अर्थात हे भगवान विष्णूचे प्रिय झाड आहे. ज्याप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेत तामसी वस्तूंचा वापर केला जात नाही त्याप्रमाणे तामसिक क्रिया करणाऱ्या लोकांनी आपल्या घरात तुळशीचे झाड लावू नये ते अशुभ फळ देते.

अर्थात ज्या घरात मांस शिजवले जाते व खाल्ले जाते अशा घरात तुळशीचे रोप लावू नये. भगवान विष्णूच्या भक्तासाठी मद्यपान वर्जित मानले गेले आहे. ज्या घरातील लोक दारू पितात किंवा ज्या घरात बसून लोक मद्यपान करतात त्या घरात तुळशीचे झाड लावू नये.

अशा घरात तुळशी ठेवल्यामुळे लाभ होण्याऐवजी हानी होते. जर तुम्ही या कठोर नियमांचे पालन केले नाही तर घरात तुळशीचे रोप लावू नका. कधीही तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नये कारण त्या दिशेकडे ठेवली गेलेली तुळस नेहमी अशुभ फळ देते.

तुळशीला नेहमी उत्तर दिशेला लावावे जी बुधाची दिशा मानली जाते. तुळशी जमिनीत लावू नका ती नेहमी कुंडलीत लावावी. जर कोणत्याही स्त्रीची मासिक पाळी चालू असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये.

जेव्हा दुशासन द्रौपदीला वस्त्रहरणासाठी आणण्यासाठी गेला तेव्हा असे म्हटले जाते की तिचा मासिक धर्म चालू होता. ती एक वस्त्रा होती व पवित्र स्थानी जात नव्हती. म्हणून मासिक धर्माच्या वेळी पवित्र स्थानी स्त्रियांनी जाऊ नये.

चरित्रहीन स्त्री ने तुळशीची पूजा करू नये . दुष्ट स्त्रीने , कपटी स्त्रीने तुळशीची पूजा करू नये त्याचे अशुभ फळ मिळते. तर मित्रांनो अशा प्रकारे तुळशी संबंधित शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत जे तुम्ही कायम लक्षात ठेवणे जरुरी आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here