या 3 स्त्रियांनी श्रावणी सोमवारचे व्रत करू नये…

नमस्कार मित्रांनो

मित्रानो भगवान शिव अत्यंत मनमोहक आहेत, ते आपल्या भक्तांना आपल्या आश्रयामध्ये घेऊन त्यांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांना जगभरातील सर्व सुख देतात. पण ज्याच्यावर ते रागावतात, त्यांनाही ते स्वतःपासून कायमचे दूर करतात आणि पुन्हा त्यांच्याकडे कधीच पाहत नाहीत.

श्रावण महिना सुरू झाला आहे, श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, त्यामुळे या श्रावण महिन्यात संपूर्ण वातावरण शिवमंत्रांनी पवित्र उर्जेने भरलेले असते. श्रावण महिन्यात भक्त पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना करतात आणि त्यांच्या भक्तीत लीन होतात.

शिव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या परम भक्तांमध्ये विराजमान आहेत. शंकर जी प्रत्येक भक्तावर आपल्या कृपेचा वर्षाव करतात, परंतु तरीही काही लोकांना ते कोण आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असूनही त्यांच्या कृपेचा लाभ मिळत नाही, ते लोक कोण आहेत आज याबद्दल सांगणार आहोत.

त्याआधी जाणून घेऊया अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या शिवाला कधीही अर्पण करू नयेत, शास्त्रानुसार या गोष्टी शिवावर अर्पण केल्याने कोप होतो. म्हणूनच या तीन गोष्टी भगवान शिव भक्तांनी कधीही अर्पण करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया या तीन गोष्टी कोणत्या आहेत.

तुळशीची पाने – तुळशीची पाने हा प्रत्येक पूजेच्या साहित्याचा विशेष भाग असतो. तुळशीच्या पानांचा उपयोग शुभ प्रसंगी केला जातो, तुळशीच्या पानांचा वापर भगवान विष्णूच्या पूजेत केला जातो, भगवान शिवाची पूजा करताना तुळशीची पाने वापरू नका कारण तुळशी ही भगवान विष्णूची पत्नी आहे.

शंख – भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नका, कारण शंखचूड नावाच्या राक्षसाचा भगवान शंकराने वध केला आणि त्याच्या भस्मापासून शंख जन्माला आला. शिवाला शंखाने जल अर्पण केल्याने शंकर क्रोधित होतात. त्यामुळे शंखाचा वापर करू नये.

केतकीचे फूल – जुन्या काळात वर्णन केलेल्या एका कथेनुसार, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वादात केतकीने ब्रह्माजींचे खोटे बोलणे समर्थन केले. या वादात भगवान शिव निर्णायक ठरले आणि केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तिचे फूल माझ्या पूजेत वापरले जाणार नाही. तेव्हापासून केतकीचे फूल जरी शिवाला पांढऱ्या रंगाचे फुल प्रिय असले तरी अर्पण केले जात नाही. तर या होत्या त्या धार्मिक वस्तू ज्या शिवपूजेत वापरू नयेत.

चला आता जाणून घेऊया की श्रावण सोमवारचे व्रत कोणत्या लोकांनी ठेऊ नये. महादेव खूपच सरळ आहेत पण त्यांची भक्ती करणे सर्वांसाठी सोपे नसते, शिवजी यांची आराधना करण्यासाठी स्वतः शिवजी सारखे असावे लागते. जो शिवजी सारखा नसतो त्याला भगवान शिव स्वतः त्याच्यापासून लांब करतात.

मित्रानो भगवान शिवजी यांचा स्वभाव सहज, सरळ आणि कपट रहित असतो म्हणून जे लोक कपटी व दृष्ट असतात शिवजी त्यांच्यावर कधीच लक्ष देत नाहीत. मग त्यांनी कितीही शिवजिंची आराधना केली तरी शिवजी त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी टाकत नाहीत.

शिवजी शांत स्वभावाचे आहेत आणि विनाकारण सतत भांडण व वादविवाद करणाऱ्या स्त्रीला भोलेनाथ कधीही पसंद करत नाहीत. अशा स्त्रीने श्रावण सोमवारचे व्रत जरी केले तरी देखील त्या स्त्रीला त्या व्रताचे फळ मिळत नाही.

भगवान शिव मोह माया पासून कोसो दूर आहेत. त्यामुळे जी स्त्री लालची आहे जे मिळाले आहे त्यामध्ये संतुष्ट न होता दुसऱ्यांच्या वस्तू प्रती आकर्षित होते अशा लोकांना भगवान शंकराचा आशीर्वाद कधीच मिळत नाही.

भगवान शिव नारी शक्तीचा मान करणारे आहेत त्यामुळे जे लोक स्त्रियांचा आदर करत नाहीत, पर स्त्रीवर वाईट दृष्टी टाकतात , बलात्कार, छेड काढतात असा पुरुष कधीच शिवजी यांचा भक्त असू शकत नाही असा व्यक्ती शिवजी यांच्या कृपेपासून वंचित राहतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *