नमस्कार मित्रानो
मित्रानो आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती देणार आहोत की ज्यामुळे विवाहित पुरुष हैराण होतात.. वैवाहिक जीवनामध्ये जिथे अंत्यंत प्रेम असते तिथे थोडीफार लहान मोठे वादविवाद होणे अगदीच साधारण बाब आहे. पत्नीच्या काही गोष्टींमुळे पतीचा मूड खराब होऊन जातो. याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यावर पडतो.
आपल्या वैवाहिक जीवनात जर नेहमी आनंद आणि सुखाची बरसात व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे, काही गोष्टी कटाक्षाने टाळणे हे अत्यंत जरुरीचे आहे. तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत.
कधीकधी असे होत असेल की रागामध्ये पती पत्नीला काही चुकीचे बोलतो आणि पत्नी त्याला प्रतिउत्तर देत बसते. अस केल्याने वाद-विवाद अजूनच वाढतात. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जाणे हाच एक त्यावर पर्याय आहे.
सासूच्या चहाड्या आपल्या पती समोर कधीही करू नयेत. आई कशीही असली तरीही आपल्या मुलांसाठी ती चांगलीच असते. चहाड्या करण्याऐवजी तुम्ही आपली समस्या योग्य शब्दांमध्ये मांडू शकता. आणि त्यावर उपाय देखील त्यालाच सांगायला लावू शकता. अस करून तुम्ही तुमच्या पतीच्या नजरेत तुमचा मान अजूनच वाढवाल.
पती पत्नी मध्ये वाद होणे अगदीच स्वभाविक गोष्ट आहे. अस असलं तरीही पत्नीने, ” तुमच्याशी लग्न करणे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती.”, अस बोलून दाखवू नये. या गोष्टीने पतीला खूप वाईट वाटते. पण लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट वारंवार बोलू नका ज्यामुळे तुमच्या पतीला वाईट वाटेल.
अनेकदा स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना बघून जळतात. जस महागड्या साड्या, दागिने..! ईर्षेने त्या वस्तू आपल्यालाही पाहिजेत असा हट्ट आपल्या पती जवळ करतात. परंतु बऱ्याचदा हा खर्च पतीच्या खिशाला परवडणा-या सारखा नसतो.
किंबहुना त्याची गरजही नसते. जगातील कोणत्याच पतीला असं वाटत नाही की त्याची बायको नाराज दुखी असावी, म्हणून तो आपल्या पत्नीस जगातील सर्व सुख देऊ इच्छितो. तर समजूतदारपणे वागून तुम्ही तुमच्या पतीसमोर अशी कोणतीही मागणी करू नका जी तो पूर्ण करू शकत नाही.
तुमच्या पती-पत्नी मधील प्रेम दिवसेंदिवस वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नातं सुदृढ आणि प्रेमळ ठेवण्यासाठी वरील टिप्स लक्षात ठेवा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.