गुरूपुष्यामृत योग. 28 ऑक्टोबरच्या सकाळपासून अचानक चमकुन उठेल या पाच राशींचे नशिब

0
432

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूपुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जाते. अनेक लोक मोठ्या आतुरतेने या नक्षत्राची प्रतीक्षा करत असतात. दिनांक २८ ऑक्टोबर रोजी हा संयोग जमून येत असून गुरुवार रोजी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग बनत आहे.

गुरुवारच्या दिवशी पुष्ययोग येत असल्यामुळे याला गुरूपुष्य अमृत योग असे म्हटले जाते. गुरूला पुष्य नक्षत्राचा देवता मानले जाते. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जात असून या दिवशी केलेले कोणतेही शुभ काम अतिशय लाभदायक मानले जाते.

दीपावलीच्या ठीक आधी हा योग जमून येत असून मूल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. अश्विन कृष्ण पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक २८ ऑक्टोबर रोज गुरुवार सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी गुरूपुष्य अमृत योगाला सुरवात होणार असून २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी योग समाप्त होणार आहे.

विशेष म्हणजे याच दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि रवी योग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनात अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी अशुभ स्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस दूर करणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात घेऊन येणार आहे.

मेष रास

गुरूपुष्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येईल. या काळापासून आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. धन लाभाचे योग बनत आहेत.

कर्क रास

२८ ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या जीवनाला अतिशय सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येईल. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होणार आहे. या काळात उद्योग व्यवसायात प्रगती घडून येणार असून आपल्या मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या जीवनात आता सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत. गुरूपुष्य अमृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून या दिवशी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. नवा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. कार्यक्षेत्रात अनेक आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे.

आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळ येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. या काळात एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here