24 जून 2021 वटपौर्णिमा गुपचूप दान करा ही 1 वस्तू… वर्षभर पैसा कमी पडणार नाही…

0
1237

नमस्कार मित्रानो,

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेस वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक फार मोठा सण आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. सात जन्म हाच पती मिळावा अशा प्रकारची प्रार्थना करून वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात.

मित्रानो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या वटपौर्णिमेस आपण काही अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता. असे उपाय कि जे आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, कंगाली अलक्ष्मी यांना दूर करते. अलक्ष्मी म्हणजेच गरिबी. तुम्ही जो काही उद्योग धंदा करताय व्यापार, व्यवसाय करताय, नोकरी करताय जे काही तुम्ही काम करताय त्या कामातून मोठ्या प्रमाणात पैशांची आवक सुरू होईल.

घरामध्ये पैसा येऊ लागेल. मित्रानो एक गोष्ट सुरवातीलाच स्पष्ट करू इच्छितो कि केवळ हा उपाय केल्याने किंवा हा तोडगा केल्याने तुम्हाला पैशाची प्राप्ती होणार नाहीये. पैसा प्राप्त करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी परिश्रम, कष्ट हे करावेच लागतात. हा उपाय केवळ तुमच्या कष्टांना बळ देणार आहे. तुमच्या कष्टांचं चीज करणार आहे.

तुम्ही जितकी मेहनत कराल तितका जास्त पैसा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर प्राप्त होऊ लागेल. तर मित्रानो वटपौर्णिमेस नक्की कोणता उपाय करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया.

हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमेस केलेलं गुप्तदान हे माता लक्ष्मीस प्रसन्न करवत आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा येऊ लागतो. आपण गुप्तदान करायचं आहे. मित्रानो हा उपाय वट पौर्णिमेच्या पहाटे करायचा आहे. वटपौर्णिमेच्या पहाटेचा जो ब्रह्ममुहूर्त आहे या ब्रह्म मुहूर्ताच्या शुभमुहूर्तावर आपण हा उपाय करायचा आहे.

एक गुप्तदान करायचे आहे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय तर सूर्य उगवण्यापूर्वी, सुर्योदयापूर्वीचा जो एक ते दीड तास पुर्वीचा जो काळ असतो उदा.जर सूर्योदय सात वाजता होत असेल तर साडेपाच वाजेच्या आत आपण हा उपाय करायचा आहे. मित्रानो हा उपाय एक गुप्तदान आहे. दानधर्माचे हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे माहात्म्य आहे.

एक गुप्तदान आपण करायचे आहे. गुप्त याचा अर्थ त्याबद्दल कुठेही आपल्याला बोलायचं नाहीये. हा उपाय करण्यापूर्वी सुद्धा आणि उपाय करून झाल्यानंतर सुद्धा या गुप्त दानाची चर्चा किंवा त्याबद्दलची वाच्यता होणार नाही याची काळजी घ्या.

मित्रानो हे गुप्तदान करण्यासाठी आपल्याला तीन झाडू लागतील, लक्षात घ्या झाडे नवे हवेत. 24 तारखेच्या पहाटे आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील ज्या ठिकाणी लक्ष्मी आईच देऊळ आहे लक्ष्मीचे मंदिर आहे त्या लक्ष्मीच्या देवळामध्ये हे तीन झाडू आपण गुपचूप ठेवून यायचे आहे. वट पौर्णिमेच्या पहाटे ब्रम्हमुहूर्तावर .

मित्रानो यालाच आपण गुप्तदान अस म्हणतो. या गुप्तदानाचा महिमा जितका वर्णावा तितका कमीच आहे. हे गुप्त दान केल्याने घराची भरभराट होऊ लागते. घरातील लोकांना आरोग्याची प्राप्ती होते. घरातील जी काही नकारात्मक उर्जा असेल तिचा ऱ्हास होतो. सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी हे गुप्त दान केल जात.

मित्रानो तुम्हाला हे तीन झाडू त्या देवळात ठेवताना कोणीही पाहणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घ्या आणि हे तीन झाडू ठेवून आल्यानंतर आपण विधिवत या वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करा. त्यांच्याकडे प्रार्थना करा की हा उपाय हा तोडगा यशस्वी होवो.

लक्षात घ्या हे तीन झाडू त्या ठिकाणी ठेवून येण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान करायला हवं स्वच्छ वस्त्र परिधान करूनच आपण हा उपाय करा आणि त्यानंतर संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची आराधना करा. मित्रानो आयुष्यभर तुम्हाला पैसा कमी पडणार नाही.

माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.. अशाच पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here