उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी. या 6 राशींचे नशिब गजाननाच्या कृपेने चमकणार.

0
341

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. जेव्हा एखादी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा त्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. या दिवशी व्रत उपवास करून भगवान गणेशाची उपासना केल्याने श्री गणेश आणि मंगल देवता यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

या दिवशी व्रत उपवास केल्याने भक्ताच्या कुंडलीत असणारा मंगळाचा दोष दूर होतो . गजाननाची कृपा बरसते तेव्हा जीवनातील अंधकार दूर होण्यास वेळ लागत नाही.

मित्रानो भगवान श्री गणेश हि सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. गजाननाचा आशीर्वाद प्राप्त झाल्या नंतर मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होण्यास वेळ लागत नाही. उद्या अंगारकी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. जीवनातील अमंगल काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मंगळाची विशेष कृपा आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी संकटांची मालिका आता समाप्त होणार आहे. आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फायदे होणार आहेत.

मेष रास

मेष राशीवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. या काळात आपल्याला मंगल अतिशय शुभफळ देणार आहे. एखाद्या संकटातून मुक्त होऊ शकता. पारिवारिक जीवनात चालू असणारा ताणतणाव आता समाप्त होणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती होईल. करियर विषयी महत्वाची बातमी कानावर येऊ शकते. करियर मधील अडचणी आता दूर होणार आहेत. या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.

कर्क रास

कर्क राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येतील. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

कन्या रास

कन्या राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भावकीत अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताणतणावातून या काळात मुक्त होणार आहात. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत. या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपला राशी स्वामी मंगळ या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. या काळात कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. कला क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

धनु रास

धनु राशीवर श्री गणेश विशेष प्रसन्न होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे. घरात एखादे धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येऊ शकते. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीवर भगवान श्री गणेशाची कृपा बरसणार असून मंगळाची विशेष कृपा आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here