नमस्कार मित्रांनो,
ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानण्यात आले आहे. भाग्याचे कारक, न्यायाचे देवता आणि कर्मफलाचे दाता हे वक्री होणार आहेत.
पंचांगानुसार दिनांक 23 मे रोज रविवार दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी शनी वक्री होणार आहेत. मान्यता आहे कि जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा ते पीडित होतात त्यामुळे वक्री अवस्थेत शनी हे थोडेसे कमजोर मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या वक्री होण्याला एक महत्वपूर्ण घटना मानले जाते. दिनांक 23 मे रोजी शनी वक्री होत असून 11ऑक्टोबर 2021 रोजी ते मकर राशीत मार्गी होणार आहेत.
यावेळी शनी 141 दिवसांसाठी वक्री होणार असून याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार आहे. शनीचे वक्री होणे या 7 राशींसाठी अतिशय शुभ ठरणार असून इतर 5 राशींसाठी मात्र हे अशुभ किंवा त्रासदायक ठरू शकते.
मित्रानो भगवान शनिदेव कलियुगाचे देवता मानले जातात. ते कर्मफलाचे दाता असून न्यायप्रिय मानले जातात. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही.
कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते. इथून येणारा पुढचा काळ या सात राशींसाठी अतिशय शुभ आणि सुंदर काळ ठरणार असून यांच्या जीवनातील अशुभ काळाचा अंत होणार आहे.
आता आपल्या जीवनात नव्या प्रगतीला सुरवात होणार असून शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि संकटांची मालिका आता समाप्त होणार आहे.
यश प्राप्तीच्या दिशेने तुमच्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.
घर परिवारात चालू असणारा कलह, अशांतीचे वातावरण दूर होणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी आणि समाधानाचे दिवस येणार आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत.
या काळात बिघडलेली कामे पुन्हा बनण्यास सुरवात होणार आहे. करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.
शत्रूवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना नमते घेण्यात भाग पाडणार आहात. ज्या कामांना हात लावाल त्या कामात यश प्राप्त करणार असून यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
भगवान शनिदेवाच्या कृपेने आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. भौतिक सुख सुविधेच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे.
येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. तर इतर पाच राशींना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागणार असून जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
या काळात आपल्याला अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. कोणतेही महत्वपूर्ण काम करताना घाई गडबड करणे टाळावे लागेल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्यापैकी मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.
शनीचे वक्री होणे मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीसाठी अतिशय अशुभ ठरू शकते त्यामुळे या राशीच्या लोकांना अतिशय सावध राहणे गरजेचे आहे.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.