नमस्कार मित्रानो,
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. आषाढ महिन्यात येणारी हि पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. पंचांगानुसार दिनांक 23 जुलै 2021 रोजी शुक्रवार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमेचा पावन पर्व साजरा होणार आहे.
हि पौर्णिमा मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते. या दिवशी गुरुजनांचा आदर सत्कार करून गुरुची पूजा केली जाते , गुरूचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. हिंदू धर्मामध्ये गुरूला सर्वोच स्थान प्राप्त असून गुरूला ईश्वरपेक्षाही श्रेष्ठ मानण्यात आले आहे. गुरु हे ज्ञानाचे कारक मानले जातात.
आषाढ शुक्ल पक्ष पूर्वा आषाढा नक्षत्र दिनांक 23 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 24 जुलैच्या सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत असून या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या 6 राशींवर पडणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आता नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.
जीवनात सुख समाधान, यश आणि कीर्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सोबतच जीवन आनंदाने फुलून येणार आहे. परिवारात सुखाचे दिवस येणार असून समाजात मानसन्मानाची प्राप्ती होईल. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.
मेष रास
मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. गुरूच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून करियर मध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापार आणि व्यवसायात भरभराट पाहावयास मिळेल.
वृषभ रास
वृषभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून जीवनात वारंवार येणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला नवी चालना प्राप्त होणार आहे. गुरूच्या आशीर्वादाने जे काम हाती घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. घर परिवारात सुखाचे वातावरण राहील. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
सिंह रास
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सिंह राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या नेतृत्व क्षमतेच्या बळावर कार्यक्षेत्रात खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून उद्योग व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता हळू हळू समाप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीला नशीब आता भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनंत समस्या आता समाप्त होतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. या काळात प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रेमी युगलांच्या जीवनात अतिशय अनुकूल काळ येणार असून प्रेमात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार आहे.
वृश्चिक रास
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव आता दूर होईल.
कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत त्यामुळे आपल्या उत्साहात वाढ होणार असून एखाद्या नव्या कामाची सुरवात करणार आहात. परिवारातील सुख समाधानात वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.
कुंभ रास
कुंभ राशीवर ग्रहनक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून पौर्णिमेपासून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. करियर विषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. घर परिवारात सुखाचे दिवस येतील. जीवन जगण्यात आनंद निर्माण होणार आहे. जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होणार आहे. सोबतच धनलाभाचे योग जमत आहेत.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.