नमस्कार मित्रानो,
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. दिनांक 23 जुलै रोजी येणारी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हटले जाते. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो.
गुरु पौर्णिमेचा हा शुभ पर्व गुरूला समर्पित असून या दिवशी गुरुची पूजा केली जाते. गुरूला जीवनात सर्वोच स्थान प्राप्त असते. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा देखील म्हटले जाते.
आषाढ शुक्ल पक्ष पूर्वा आषाढा नक्षत्र दिनांक 23 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 24 जुलैच्या सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
विशेष म्हणजे या दिवशी गुरु कुंभ राशीत राहणार आहेत. गुरु कुंभ राशीत वक्री होणार आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशींवर पडणार असून गुरु पौर्णिमेपासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
गुरुची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. अज्ञानाचा अंधकार आता दूर होणार असून ज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन उजळून निघणार आहे. गुरुचे पाठबळ आपल्या राशीला लाभणार आहे त्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही.
गुरु पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय उत्तम काळ ठरणार आहे. गुरूच्या कृपेने आपल्या सुख सौभाग्य आणि समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
गुरूच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून यशाचे अनेक कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोण कोणते फायदे होणार आहेत.
मेष रास
मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून गुरुची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. कामात वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून आपण करत असणाऱ्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन सुरु केलेलं उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहतील.
मिथुन रास
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मिथुन राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून गुरूचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धनसंपत्ती पहिल्यापेक्षा जास्त वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या रास
कन्या राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. गुरु पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
तूळ रास
तूळ राशीवर गुरुची विशेष कृपा बरसणार असून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येउ शकतात.
उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न या काळात पूर्ण करून दाखवू शकता. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन उपलब्ध होणार आहेत.
कुंभ रास
गुरु पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार असून गुरुचे पाठबळ लाभणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येऊ शकतात. उद्योग व्यवसायात आपण केलेले बदल लाभदायक ठरतील.
व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवणार आहात. घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.