मकर राशी 22 जून ते 17 जुलै सर्वच मनोकामना होतील पुर्ण…

0
4869

नमस्कार मित्रानो,

मित्रानो ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो.ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो.

असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ मकर राशीच्या जीवनात येणार असून दिनांक 22 जून पासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून 22 जून ते 17 जुलै या काळात आपला भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात अशाच काहीशा शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार असून जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मित्रानो दिनांक 22 जून रोजी शुक्र ग्रहाने राशीपरिवर्तन केले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला अतिशय शुभ ग्रह मानण्यात आले आहे. शुक्र हे नैसर्गिक भोगविलास, वैवाहिक जीवन, प्रेम, कला, सौंदर्य आणि भौतिक सुख समृद्धी बरोबरच कामुकतेचे कारक ग्रह मानले जातात.

शुक जवळपास 23 दिवसांत आपली राशी बदलत असतात. ते एका राशीतून दुसर्या राशीत गोचर करत असतात. 22 जून रोजी शुक्राने मिथुन राशीतून कर्क राशीत गोचर केले आहे आणि दिनांक 17 जुलै पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा इथून पुढचा येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे.

हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाची गाडी वेगाने धावणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकुल ठरणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पहावयास मिळेल.

वैवाहिक जीवनात मधुरता निर्माण होणार आहे. जीवनातील जोडीदाराप्रती आपले प्रेम वाढणार आहे. उद्योग, व्यापार आणि नोकरीमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये उन्नतीचा काळ येणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.

धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून पैसे कमावण्याच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. या काळात कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

या काळात कलाकारांना विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो.

भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात परिवारासाठी दाखवलेले स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहात. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here