नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज मध्य रात्री नंतर म्हणजे 22 फेब्रुवारी रोज सोमवारी मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ राशी परिवर्तन करणार असून ते आपल्या स्वतःच्या राशीतून म्हणजे मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत.
ज्योतिषानुसार मंगळ साहस, ऊर्जा आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. कुंडली मध्ये मंगळ जेव्हा उच्च किंवा शुभ स्थानी असतो तेव्हा मनुष्याचे जीवन साहस पराक्रम आणि ऊर्जेने भरपूर असते. मंगळ व्यक्तीच्या जीवनात राजयोगाचे दिवस घेऊन येत असतो.
व्यक्तीच्या महत्वकांक्षेत वाढ होते आणि मंगळाच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन बहरून येते. ज्योतिषशात्रा नुसार मंगळाचे होणारे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.
संपूर्ण 12 राशींवर मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या 6 राशींचे भाग्य चमकणार आहे. मंगळाचे हे गोचर या राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.आता आपले भाग्य चमकायला वेळ लागणार नाही.
येणार काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास
मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
कार्य क्षेत्रामध्ये मोठा विस्तार होण्याचे संकेत आहे. आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे त्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.
कौटुंबिक सुख उत्तम लाभणार असून करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. नवीन कामाची सुरवात करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. मंगळाच्या कृपेने धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे.
वृषभ रास
मंगळाचे आपल्या राशीत होणारे आगमन अनेक शुभ परिणाम घेऊन येणार आहेत. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने मंगळाचे हे गोचर अतिशय लाभदायक ठरणार आहे.
कार्यक्षेत्राचा मोठा विस्तार घडून येणार असून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या योजना या काळात पूर्ण होणार आहेत.
व्यापारी वर्गासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. उद्योग व्यापारातून भरपूर नफा मिळण्याचे संकेत आहेत.
आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे पण गुंतवणूक करताना त्या संबंधी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विशेष लाभ प्राप्त होणार आहे.
सिंह रास
मंगळाचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी खास ठरणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. या काळात आपला आत्मविश्वास आणि पराक्रम दोन्ही मध्ये वृद्धी होणार आहे.
या काळात आपली आर्थिक स्थिती अतिशय मजबूत बनणार आहे. मागील काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभाची ठरणार आहे. त्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये आर्थिक आवक वाढणार आहे. वेळ वाया न घालवता वेळेचा सदुपयोग करा. हा काळ आपल्यासाठी राजयोगा समान सिद्ध होणार आहे.
तूळ रास
मंगळाचे वृषभ राशीत होणारे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात आपल्या पराक्रमामध्ये वृद्धी होणार असून अचानक धनप्राप्तीचे योग बनत आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.
कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख उत्तम लाभणार आहे. या काळात आपल्या आर्थिक उन्नती मध्ये मोठी वाढ होणार असून मान सन्मानाची प्राप्ती होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाला वाव मिळणार आहे.
धनु रास
मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. या काळात आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येईल. आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.
कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची ओळख होऊ शकते ज्याचा फायदा भविष्यात दिसून येईल. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे.व्यवसायानिम्मित केलेले प्रवास लाभाचे ठरतील. पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल.
कुंभ रास
मंगळाचे वृषभ राशीत होणारे गोचर कुंभ राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. आपल्या पद प्रतिष्टेमध्ये वाढ होणार असून मानसन्मानाचे योग बनत आहेत. धन प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
कार्यक्षेत्रात उत्साह आणि पराक्रमात वाढ होणार आहे. घर, जमीन अथवा वाहन खरीदीचे योग आहेत. एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. उद्योग व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतो.
प्रेम जीवनामध्ये नव्या ऊर्जेचा संचार होणार असून आपले नातेसंबंध अधिक मजबूत बनणार आहेत. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्तीचे संकेत आहेत.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.