नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मानुसार प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्रावण शुक्ल पक्षात येणारी नारळी पौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा होत असतो म्हणून या दिवसाचे महत्व आणखीनच वाढत आहे.
हि पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी मानली जात असून या दिवशी भगवान भोलेनाथा बरोबरच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे विशेष लाभकारी मानण्यात आले आहे. आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी सांयकाळी ७ वाजून १ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून उद्या दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे.
२२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होत आहे आणि आज शनिवार असून पंचांगानुसार चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. मित्रानो शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस आहे. शनी हे कलयुगाचे देवता मानले जातात. शनी प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.
शनी महाराज न्यायाचे देवता आणि कर्मफलाचे दाता मानले जातात. जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. मनुष्याचे नशीब पालटण्यास वेळ लागत नाही.
नारळी पौर्णिमेला असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक संयोग या पाच राशींच्या जीवनात येणार असून आज मध्य रात्री पासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
आता जीवनातील आर्थिक संकटे दूर होण्यास वेळ लागणार नाही. जीवनात चालू असणारी अपयशाची स्थिती आता बदलणार असून आपल्या यश प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या मनात असणारी उदासी , नाकारात्मक भावना आता मिटणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास
मेष राशीवर नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून भगवान शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होईल. अनेक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत.
नाते संबंधात आलेली कटुता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या यश प्राप्तीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात मानसिक ताणतणाव दूर होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. जीवनात जे ध्येय आपण निश्चित केले आहे ते प्राप्त करून दाखवण्याची वेळ आली आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भाग्योदयाचे संकेत आहेत. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. धन लाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.
कन्या रास
कन्या राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून शनीच्या आशीर्वादाने सुख समाधानात वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होण्यास सुरवात होईल. अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात धनलाभाचे योग जमून येणार आहेत.
तूळ रास
तूळ राशीवर पोर्णिमाचा सकारात्मक प्रभाव पडणार असून आपल्या जीवनात चालू असणारा शनीचा नकारात्मक प्रभाव आता दूर होणार आहे. जीवनात चालू असणारी उदासी आता मिटणार असून जीवन जगण्यात आनंद निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार आहेत. कौटुंबिक कलह मिटणार असून वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
कुंभ रास
कुंभ राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव आता दूर होण्यास सुरवात होणार असून पौर्णिमेला बनत असलेली चंद्र आणि गुरुची युती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.
या काळात आपल्या भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आपल्या धन प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. सामाजिक क्षेत्रा बरोबरच राजकीय क्षेत्रात प्रगतीचे दिवस येतील. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून मनाप्रमाणे फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.