नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारी चाल मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम करते. कधी कधी आयुष्यात सर्वच बाजूनी शुभ घटना घडतात तर कधी चहो बाजूने त्रास उदभवतात.
ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात जे काही चढ उतार येतात त्यामागे ग्रह नक्षत्राची हालचाल मुख्य जबाबदार मानली जाते. जर राशी चक्रातील ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्याचा शुभ परिणाम मिळतो, आणि हालचाल चांगली नसेल तर अशुभ परिणाम मिळतो.
मेष रास
कुटुंबातील सदस्यांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. कार्यक्षेत्रात जोडीदाराचे सहकार्य उपयुक्त ठरेल. राजकीय धनप्राप्तीचे सुद्धा योग जुळून येत आहेत. सर्व शुभ असले तरी आरोग्याकडे लक्ष देणे जरुरी आहे.
आरोग्य बिघडू शकते. सामाजिक कार्य केल्याने कुटुंबाचा सन्मान होईल. भाग्याची भरपूर साथ मिळाल्याने निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल. विद्यार्थी यशाच्या मार्गावर प्रगती करतील. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. कुटुंबात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे.
भावाचा सल्ला प्रगतीसाठी कारणीभूत ठरेल. कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. दिखावा करणे टाळा अन्यथा शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.
कर्क रास
भाग्याची तुम्हाला चांगली साथ लाभणार असून कार्यशैली सुधरणार आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामे यशस्वी होतील. लव्ह लाईफ साठी वेळ काढाल ज्यामुळे जोडीदार आनंदी होईल. कुणाला उधार देणे टाळा अन्यथा पैसे परत मिळण्याची आशा नाही.
जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या संबंधित केलेले प्रवास सफल ठरतील. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. सायंकाळी कुटुंबासह फिरायला जाल. कार्यालयात सकारात्मक वातावरण राहील. संततीच्या बाबतीत समाधानी दिसाल.
कन्या रास
या पुढे तुमची वाटचाल योग्य दिशेने होणार आहे. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. शत्रू नुकसान करू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे मनशांती मिळेल. आर्थिक स्थिती सुधरेल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक हानिकारक ठरू शकते.
स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. मोठेपणा दाखवण्यासाठी काही खर्च करू शकता जो व्यर्थ होईल. सेवा करण्याचे चांगले फायदे मिळतील. प्रेम संबंधांत सुखद अनुभव मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा आर्थिक स्थिती डगमगू शकते.
कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. पण बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामे आधीच पूर्ण करा.
मीन रास
व्यापारात जोखीम घ्याल तर त्याचा फायदाच होईल. रोजगारा संबंधी एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंद देईल. विवाह योग्य जातकांना चांगले प्रस्ताव येतील. संतती संबंधी शुभ माहिती मनाला आनंद देईल.
धार्मिक कार्य करा. संकटात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत केली तर शुभ ठरेल. संध्याकाळ मित्र मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत मौज मजा करण्यात व्यतीत होईल.
गुंतवणुकीसाठी वेळ चांगली आहे. ज्यामुळे कामात उत्साह येईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कुटुंबात शांती अनुभवता येईल.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.