नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यात आलेली पौर्णिमा अतिशय पवित्र आणि पावन मानली जाते. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला आणखीनच मजबूत बनवणारा हा दिवस मानला जातो. शास्त्रानुसार पौर्णिमेला व्रत उपवास करून पवित्र नदीमध्ये स्नान करणे विशेष फलदायी मानले जाते.
या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण केले जाते. पंचांगानुसार या वर्षी श्रावण पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा २१ ऑगस्ट रोजी येत असून रक्षाबंधनाचा सण हा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.
या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. शिवपुजेला विशेष महत्व प्राप्त आहे. श्रावण शुक्ल पक्ष , श्रावण नक्षत्र दिनांक २१ ऑगस्ट रोज शनिवार सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनंतर पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक २२ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पंचांगानुसार दिनांक २२ ऑगस्ट रोजी चंद्र आणि गुरु अशी युती होत असून हा संयोग या ५ राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.
नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. आता इथून पुढे नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
मेष रास
नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर पडणार आहे. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय मंगलदायी ठरणार असून आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि परेशानी आता दूर होणार आहे.
हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. नाते संबंधात सुधारणा घडून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.
सिंह रास
सिंह राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवे पर्व सुरु होण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आर्थिक लाभ घडवून आणू शकतो. धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. आपल्या आत्मविश्वसात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
तूळ रास
श्रावण पौर्णिमेपासून तूळ राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना वेग येणार असून करियर मध्ये अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या जातकांवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. काही मानसिक ताणतणाव जाणवणार असला तरी प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.
मीन रास
मीन राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. पौर्णिमेपासून आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार असून आपल्या वैभवामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील. धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबू बनेल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.