नमस्कार मित्रांनो,
मित्रानो दिनांक 17 मार्च रोज बुधवार. वैभव आणि सुख समृद्धीचे दाता शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रहांचे राजा सूर्यदेव याआधीच मीन राशीत विराजमान असून शुक्र ग्रह आज मीन राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्राच्या शुभ प्रभावाने आपल्या आर्थिक स्थितीत बदल घडून येणार आहे. उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. आपली अडलेली कामे वेळेवर पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत.
कार्यक्षेत्रावर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. कार्यक्षेत्राचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.
मेष रास
मेष राशीसाठी शुक्राचे होणारे गोचर शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्याला प्राप्त होणार असून प्रत्येक संकटावर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात.
या काळात आर्थिक प्राप्ती अतिशय चांगली होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कार्येक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून यईल. खर्चा मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
वृषभ रास
शुक्राचे मीन राशीत होणारे गोचर आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. नोकरीत बढतीचे योग येणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आपली अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होण्याचे योग आहेत.
कार्यक्षेत्रात लाभ प्राप्त होणार आहे. परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
मिथुन रास
शुक्राचे होणारे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येणार आहेत. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत.
करियर मध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.
कर्क रास
शुक्राचे मीन राशीत होणारे गोचर कर्क राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात नशीब आपल्याला भरपूर साथ देणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत.
पारिवारिक आणि नाते संबंधांमद्ये मधुरता निर्माण होणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवास घडून येऊ शकतो. प्रवास करताना, वाहन चालवताना सावध राहणे आवश्यक आहे.
सिंह रास
शुक्राचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी अडचणीचे ठरू शकते. या काळात आपल्या जीवनात अनेक चढ उतार येणार आहेत. आत्मविश्वासाने कामे करण्याची गरज आहे.
कोणतेही काम करताना बुद्धी आणि विवेकाने काम करणे गरजेचे आहे. वाद विवादापासून दूर राहणे आवश्यक असून आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कन्या रास
कन्या राशीसाठी शुक्राचे गोचर यशदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार असून समाजात मानसन्मानात वाढ होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. तरुण तरुणींच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग येणार आहेत.सांसारिक सुखाची प्राप्ती होणार असून कुटुंबात आनंद आणि प्रसन्नतेचे वातावरण राहील.
तूळ रास
शुक्राचे मीन राशीत होणारे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी अडचणीचे ठरू शकते. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून वाद विवादापासून दूर राहणे गरजेचे आहे. मोठे व्यवहार करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून आपल्या शब्दाने कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.
वृश्चिक रास
शुक्राचे होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. शुक्राच्या कृपेने कार्यक्षेत्रात प्रगती घडून येणार असून नोकरीत बढतीचे योग येणार आहेत. या काळात आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी काळ अतिशय शुभ ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभू शकतो.
धनु रास
धनु राशीसाठी हे गोचर मिश्र फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती मजबूत बनणार आहे.
व्यवसायाच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत पण परिवारात ताणतणाव अथवा मतभेद होऊ शकतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.
मकर रास
शुक्राचे होणारे गोचर मकर राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात नवीन ओळखी होणार असून भविष्यात त्याचा चांगला उपयोग करून घेणार आहात. प्रेमी युगलांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.
समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार असून आपल्या प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवून गोडीगुलाबीने कामे करण्याची आवश्यकता आहे.
कुंभ रास
शुक्राचे मीन राशीत होणारे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून अचानक धन लाभाचे योग बनत आहेत.
आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणार घडून येणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून व्यवसायात वाढ होणार आहे. या काळात सुख सुविधेच्या साधनांत वाढ होणार आहे.
मीन रास
शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामांचे कौतुक होणार असून धनलाभाचे संकेत आहेत. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.समाजात मान सन्मानाचे योग बनत आहेत. या काळात आरोगयाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.