आजचे दैनिक 12 राशींचे मराठी भविष्य – 17 फेब्रुवारी…

0
242

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021. जाणून घेऊया आजचे 12 राशींचे भविष्य. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? चला तर मग जाणून घेऊ.

मेष रास

घराचे दरवाजे बंद ठेवा नुकसान होण्याची शक्यता आहे. मौल्यवान सामान इतरत्र ठेवू नका. महागड्या दाग दागिन्यांची काळजी घ्या. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराकडून चार शब्द ऐकायची तयारी ठेवा.

कामावर जास्त लक्ष केंद्रित करा व कठोर परिश्रम करा. नोकरी व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. रोजच्या कमाईत वाढ व्हावी यासाठी महत्वाच्या कामात लक्ष घाला. व्यवसायात घाईने घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. तळलेलं पदार्थ खाणे टाळा.

वृषभ रास

कुटुंबातील लोकांशी छोट्या कारणावरून भाडंण होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा. जरी कारणास्तव राग आला तरी रागावर नियंत्रण ठेवा. वादात पडल्यास प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

जोडीदाराला भेटण्यासाठी नेहमीपेक्षा विशेष तयारी करा. बऱ्याच दिवसानंतर तुमचा दिवस प्रणय व प्रेमाने भरलेला असेल. आज काही कठीण कामे तुमच्या क्षमतांची परीक्षा घेऊ शकतात. एका वेळी एकच काम करून हाती घेतलेले काम आधी पूर्ण करून नवीन काम करायला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन रास

पारिवारिक गोष्टींमुळे थोडा ताण जाणवेल. कुटुंबाला तुमच्या प्रति असलेल्या अपेक्षा आज वाढतील. लग्न किंवा प्रेमाच्या बाबतीत तुम्ही आज विचारात पडाल.तुमच्याच जवळचा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतोय हे माहित पडेल. काही काळानंतर तुम्ही सुद्धा त्याच्याकडे आकर्षित व्हाल.

नवीन व्यवसायाबाबतीत सल्लागारांचा सल्ला घ्या. आजच्या दिवशी कोणत्याही व्यावसायिक सल्लागाराकडून घेतलेला सल्ला फायदेशीर ठरेल. द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकाल. लहान लहान गोष्टीत आलेल्या अपयशाने खचून जाऊ नका.

कर्क रास

वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी आत्मसात करा. नात्यांवर प्रकाश टाकत नाती सुधारण्याचा प्रयत्न कराल. प्रेमाच्या बाबतीत सकारात्मक विचार ठेवा. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी श्रेष्ठ होऊ शकत नाही.

नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. शक्य झाल्यास शेयर बाजारापासून आज दूर राहा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास

आज आपण सामाजिक समारंभात भाग घेऊ शकता. आजचा दिवस प्रेमासाठी अत्यंत शुभ आहे. जोडीदार आणि कुटुंबियांच्या प्रेमात आज न्हाऊन निघालं. त्यामुळे मनापासून आनंदी राहा आणि भूतकाळ विसरून भविष्याबद्दल विचार करा.

व्यवसायाच्या बाबतीत एखादा आकर्षक प्रस्ताव आपल्या समोर येऊ शकतो.अशी संधी आलीच तर हातून जाऊ देऊ नका. किमती वस्तूंवर लक्ष ठेवा, हलगर्जी पणामुळे मौल्यवान वस्तू गमावून बसाल. बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा होईल.

कन्या रास

आज तुम्ही घरीच राहून घरच्यांसोबत गप्पांचा आनंद घ्या. मित्रांसोबत भूतकाळात घालवलेले क्षण आठवतील. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीला प्रपोज करायची इच्छा होऊ शकते. सावध राहा तुम्हाला ठेच लागू शकते.

कार्यक्षेत्रात आज चांगली कामगिरी कराल. मदत लागली तर निसंकोच मागा. जर आपण निर्यातीच्या व्यवसायात आहात तर आजचा दिवस शुभ आहे. आज पित्ताचा त्रास जाणवू शकतो. तेलकट, तुपकट, तिखट व मांसाहार टाळा.

तूळ रास

आज तुम्ही आपले मन प्रार्थना व ध्यानात लावा व शांती शोधण्याचा प्रयत्न करा. आज तुमचा जोडीदार सुंदर प्रकारे प्रेम व्यक्त करून आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खूप खूप आनंदी असाल. तुम्ही सुद्धा त्याला प्रतिसाद द्याल.

कामाचा ताण तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यातून नोकरी बदलण्याचा विचार डोक्यात येईल. सर्व पर्यायांवर योग्य विचार करून निर्णय घ्या. तणाव दूर ठेवा अन्यथा त्यात वाहून जाल. रक्तदाब रोग्यांना आरामाची गरज आहे.

वृश्चिक रास

आज आसपासच्या लोकांना प्रभावित कराल. पण त्याचा जास्त अभिमान बाळगू नका. मित्र आज विरोधात जाऊ शकतात. आज तुम्ही जोडीदाराच्या बाबतीत काहीसे भरकटत जाल. परंतु जोडीदारासोबत पूर्ण प्रामाणिक राहाल याची काळजी घ्या.

कामातील अडचणी दूर होतील. मोठ्या अडचणी आल्यातर आपल्या क्षमतेनुसार त्या सोडवा. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

जीवनाप्रती तुम्ही दृष्टी पूर्णपणे बदलून जाईल आज एखादा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल. आज तुम्ही जोडीदारासोबत मनमोकळे कराल. नात्यात प्रामाणिक राहा. आज तुम्ही स्वतःवरच समाधानी असाल त्यामुळे नाते घट्ट बनेल.

सहकाऱ्यांकडून मिळणार सहकार्यामुळे कामात यश मिळेल. तुमचे कार्य योग्य प्रकारे पार पाडाल. विनाकारण पैसे खर्च होऊ शकतात. ट्राफिक मध्ये अडकल्यामुळे चिडचिड होऊ शकते.

मकर रास

आजचा दिवस परिवारासोबत बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रणय जीवनात गोंधळ उडू शकतो. तुमच्या मित्रांना सुद्धा तुमच्या जोडीदाराप्रती काहीच इंटरेस्ट नसेल. त्यांच्या भावनांचा अनादर करू नका.

नोकरी व्यवसायात खूप कष्ट करावे लागतील. धैर्याने कामाला सामोरे जा. मेहनतीचे फळ तुम्हाला आज मिळेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. वेळ वाया न घालवता व्यायाम करण्यावर जोर द्या.

कुंभ रास

उत्साहाने भरलेला असेल आजचा दिवस. सामाजिक किंवा कौटुंबिक समारंभात जाल तिथे एखादी व्यक्ती आवडू शकते. तुमच्या कुटुंबातील व्यक्ती त्या आवडलेल्या व्यक्तीशी ओळख करून देऊ शकतो.

आज कामाच्या ठिकाणी स्वभावावर नियंत्रण ठेवा सयंम बाळगा. शेयर बाजाराचा विचार करू शकता. शरीरात झालेला सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल. सकस आहार व हलका व्यायाम केल्याने फायदा होईल.

मीन रास

आज तुम्हाला तुमचा दूरच मित्र मेल किंवा फोन करेल. हा मित्र घरी सुद्धा येऊ शकतो त्याचा योग्य तो पाहुणचार करा. प्रेमाच्या बाबतीत एकटेच असाल तर आजचा दिवस चांगला जाईल. पण लक्षात ठेवा कोणाच्याही भावनांशी खेळू नका.

ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायानिम्मित प्रवास घडू शकतो. पण त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. विनाकारण तणाव घेऊ नका त्याने तुमच्या आरोग्यावर तणाव पडू शकतो. अतितणावाने पचनसंस्था बिघडेल परिणामी लहान लहान विकार होतील.

असंच 12 राशींचे रोजचे भविष्य वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here