नमस्कार मित्रानो,
मित्रानो सूर्यदेवाना ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतो, अशा प्रकारे सूर्यदेव दरमहिन्याला एक राशी प्रमाणे 12 राशींचा प्रवास वर्षभर करत असतात. सूर्यदेवाचे हे गोचर काही राशींना शुभफल देते तर काहींना याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
मित्रानो सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या स्थितीला सूर्य संक्रांती या नावाने ओळखले जाते. अशीच संक्राती येणाऱ्या 16 जुलै 2021 रोजी होणार आहे. सूर्य शुक्रवारी म्हणेजच 16 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
पुढे 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत तो याच म्हणजे कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर सूर्य राशी परिवर्तन करून आपल्या स्वतःच्या राशीत म्हणेजच सिंह राशीत गोचर करणार आहे. सूर्याच्या याच संक्रमणामुळे काही राशींवर याचा वाईट प्रभाव दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
धनु रास :
मित्रानो धनु राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा काळ शुभ ठरेल. जे शिक्षण घेत आहात त्यात यश मिळेल. जो नोकरदार वर्ग आहे त्यांना मात्र हा काळ निराशाजनक राहणार आहे. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, परिणामी आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. त्वचा रोगींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जिकडे जाल तिकडे आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.
मकर रास :
लग्न झालेल्या जोडप्यांना सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन अडचणीत आणू शकते. नवरा बायको मध्ये शुल्लक कारणावरून खटके उडू शकतात. एकमेकांची मते एकमेकांना पटणार नाहीत.
अविवाहित तरुण तरुणी लग्नासाठी वधू किंवा वर शोधत असतील तर लग्न जुळणे देखील या काळात कठीण होईल. व्यावसायिक वर्गाला या काळात आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. परिणामी मानसिक ताणतणावात भर पडेल. भान ठेवा, कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.
कुंभ रास :
सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी चांगले पण आहे आणि थोडे वाईट सुद्धा आहे. सरकार दरबारी अडकलेली कामे या काळात पूर्ण होतील. कोर्टात एखाद्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल पण यामुळे दुश्मन तुमच्यावर रुबाब दाखवण्याचा प्रयन्त करेल.
वैवाहिक जीवनात निराशा पदरी पडू शकते. त्यामुळे वाद घालत बसू नका. तोंडावर आवार घाला. एकमेकांची मने दुखावतील असे शब्द बोलू नका. आरोग्य संभाळणे अत्यंत महत्वाचे. जोडीदाराची काळजी घ्या.
मीन रास :
मीन राशीच्या लोकांना सूर्याचे हे राशीपरिवर्तन अजिबात मानवणारे नाहीये. कामे मार्गी लागतील पण त्यासाठी भयंकर संयमाची गरज आहे. वैवाहिक जीवनात खटके उडून ताटातूट होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रेमिका यांच्यात नाते संपुष्टात येऊ शकते.
कोणाला शकयतो पैसे उधार देऊ नका. दिल्यास परत मिळण्याचे चान्सेस फारच कमी आहेत. व्यवसायात सावधगिरी बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा काळ सोन्याहून पिवळा आहे.
वरील लेख सर्वसामान्य माहितीवरून आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून आम्ही या माहितीची पुष्टी करीत नाही. कुठल्याही निष्कर्षावर जाण्याआधी एकदा ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
अशाच रोजच्या राशीभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.