12 जुलै 2021… आजचे राशी भविष्य… जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस…

0
340

मेष रास : आज तुमच्या हातून प्रेम प्रकरणात चुका होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या निर्णयाचे पालन करावे लागेल. आज ताणतणाव रहित दिवस असला तरी स्वतःला वेळ द्या. भगवान शंकराची पूजा करा. शुभ रंग – 9 शुभ रंग – केसरी.

वृषभ रास : आजचा दिवस तुम्ही अगदी आनंदात घालवाल. मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी होतील पण वाद घालणे टाळा. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळे. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. दुधाचा नैवैद्य कुल देवाला दाखवा. शुभ रंग – 7 शुभ रंग – गुलाबी.

मिथुन रास : मिथुन राशीच्या जातकांनी तब्येतीकडे विशेष लक्ष देणे जरुरी आहे. वायफळ पैसे खर्च करू नका. जवळच्या व्यक्तींना वेळ द्या. काम कितीही असो कंटाळा करू नका. नुकसान होऊ शकते. गाईला चारा खाऊ घाला. शुभ अंक – 8, शुभ रंग – पांढरा.

कर्क रास : परिवारातील महत्वाची कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. तब्येत सांभाळा. जुने प्रियजन व मित्र मैत्रिणी यांच्या गाठी होतील. जुन्या मित्रांची आवडत्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात त्यामुळे तोंडावर ताबा ठेवा. कामावर जाताना दही खाऊन घराबाहेर पडा. शुभ अंक – 6, शुभ रंग – करडा.

सिंह रास : मनाला पटेल असेच वागा. समोरची व्यक्ती कोणी पण असो बोलताना भान ठेवा. घरातील वातावरण तणावपूर्ण राहील. मनाला प्रसन्न करण्यासाठी मित्र मैत्रिणीसोबत वेळ घालवा. घरात धुपबत्ती करुन पूजा करा. शुभ अंक – 4, शुभ रंग – गुलाबी.

कन्या रास : पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र असो किंवा वरिष्ठ आदराने वागा. अपमान करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ उत्तम लाभेल. निर्णय घेताना घाई करू नका नुकसान होण्याची शक्यता आहे. खडीसाखर खाऊन घरा बाहेर पडा. शुभ अंक – 3, शुभ रंग – क्रिम कलर.

तुळ रास : आज तब्येत थोडी कमजोर होऊ शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे. दररोज व्यायाम करण्याची सवय लावा म्हणजे मन प्रसन्न राहील. घरात इतर व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. निर्णय घेण्यास घाई करू नका. घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा. मुक्या प्राण्यांना खाऊ घाला. शुभ अंक – 1, शुभ रंग – पिवळा.

वृश्चिक रास : आज तुम्हाला मणक्याचा त्रास उदभवू शकतो. मान आणि पाठीला रग लागून वेदना होऊ शकतात. या छोट्या छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो आजचा दिवस आराम करण्यात घालवा. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होईल परिणामी घरात वातावरण तणावाचे राहील. देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ अंक – 2, शुभ रंग – आकाशी.

धनु रास : आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंदाचा जाईल. उत्साहाने परिपूर्ण असा दिवस असेल. मित्र आणि परिवारासोबत बाहेर थोडा वेळ घालवा. एखादा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबाची साथ उत्तम लाभेल. सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा. शुभ अंक – 6, शुभ रंग – जांभळा.

मकर रास : आजचा दिवस उत्साहपूर्ण असेल. नोकरीत वरिष्ठ तुमचे काम बघून खुश होतील. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील व्यक्तींशी वाद घालू नका. पक्षांना अन्नदान करा.जेवणानंतर गुळ खा. शुभ अंक – 9, शुभ रंग – पोपटी

कुंभ रास : आज कामात चिडचिड होऊ शकते त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करणे जरुरी आहे. व्यावसायिकांनी पैशाचा व्यवहार असेल तर सांभाळून करावा. फसवणूक होऊ शकते. घरातील व्यक्तींचा मान राखा. शारीरिक कमजोरी जाणवेल पण आराम केल्यास उत्साही व्हाल. शुभ अंक – 4, शुभ रंग – जांभळा.

मीन रास : आजच्या दिवसाची सुरवात थोडी फार नकारात्मक राहील. निष्काळजी पणा दाखवून कामे करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. दिवस नकारात्मक असला तरी काळजी पूर्वक कामे केल्यास सर्व ठीक होईल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीला जपा. लक्ष्मीची पूजा करा. शुभ अंक – 8, शुभ रंग – निळा.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here