नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला जया एकादशी या नावाने ओळखले जाते.
या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पुष्प , जल ,अक्षदा आणि विशिष्ट सुगंधित पदार्थ अर्पण करणे लाभकारी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या वेळी एकादशीला विशेष संयोग बनत आहेत.
हे संयोग मेष आणि कुंभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. एकादशी पासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
मित्रानो उद्या माघ शुक्ल पक्ष आदरा नक्षत्र दिनांक १२ फेब्रुवारी रोज शनिवार लागत असून जया एकादशी आहे. पंचांगानुसार या दिवशी सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत.
सूर्याच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येणार आहे. सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. ते ऊर्जेचे कारक आहेत. सूर्यदेव हे मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेचे दाता मानले जातात. सूर्य जेव्हा शुभफल देतात तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही.
सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकण्यासाठी पुरेसा असतो. मेष आणि कुंभ राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. एकादशीचा शुभ प्रभाव आणि सूर्याचे राशी परिवर्तन मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून मेष आणि कुंभ राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.
मेष रास
सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात आपल्याला अतिशय सुंदर फळ प्राप्त होणार आहे. आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईच्या साधनांत वाढ होणार आहे.
आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिवारातील मोठ्या व्यक्तीचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. नाव लौकिकात देखील वाढ होणार आहे. नवं दाम्पत्यांच्या जीवनात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धन संपत्ती मध्ये वाढ होणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. या काळात आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यामुळे हा काळ उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील.
नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात.
या काळात जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. या काळात मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होईल. आपल्या नाते संबंधात सुधारणा घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपला नावलौकिक वाढणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.