नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,
मित्रांनो जुलै महिना संपत आला आहे. पण मित्रांनो या महिन्याच्या शेवटी आलेली संकष्टी दिवस खूप महत्वाची आहे. कारण आज मंगळवारी सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी येत आहे. मंगळवारी आलेली संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी गणपतीचा दिवस.
मंगळवारी संकष्टी येणे म्हणजे खूप शुभ फलदायी मानले जाते. जर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांसाठी काही विशेष केले जसे कि उपवास केला, काही पदार्थ केले किंवा काही उपाय केले तर तुमचे सर्व संकट विघ्नहर्ता गणेश दूर करतील.
संकष्टी चतुर्थीची अशी मान्यताच आहे कि हि संकष्टी संकटे दूर करणारी आहे. मित्रांनो या दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुद्धा हा एक उपाय नक्की करा.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 11 रुपये या ठिकाणी ठेवायचे आहेत. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास होईल, घरात सुख शांती नांदेल. तुमचे सर्व संकट दूर होतील.
मित्रांनो हे 11 रुपये तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरात डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत. हळदी, कुंकू, अगरबत्ती, आरती ओवाळून त्यांची पूजा करायची आहे.
त्यानतंर 11 वेळेस श्री गणेशाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. आणि ते 11 रुपये तिथेच देवघरात राहू द्यायचे आहेत. नंतर 28 जुलै म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ते 11 रुपये तिथून घ्यायचे आहेत आणि कोणत्याही गरजू व्यक्तीला ते दान करायचे आहेत.
गरजू व्यक्तींना देणे शक्य नसेल तर मंदिरात जाऊन तुम्ही दानपेटीत ते 11 रुपये दान करू शकता. मित्रांनो तुमच्या विभागात कडक लॉकडाऊन असेल आणि तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नसेल तर ते 11 रुपये तसेच देवघरात राहूद्या.
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल एक महिन्याने, दोन महिन्याने किंवा दारावर एखादी गरजू व्यक्ती आली तर तिला ते 11 रुपये दान म्हणून द्या. तर मित्रांनो हा एक उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.