नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो चातुर्मासातील सगळ्यात महत्त्वाचा महिना हा श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा वेगळा आणि नाविन्यपूर्ण आहे त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारचे महात्म्य हे खूप मोठे आहे.
श्रावण महिना भगवान शिव जींच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानण्यात येतो. या वर्षीच्या श्रावण महिन्यात पाच सोमवार आले आहेत. यातील पहिल्या सोमवारी शिव पूजेत आपण तांदळाच्या दाण्यांचा वापर अवश्य करा.
मित्रांनो ते तांदळाचे दाणे कशाप्रकारे अर्पण करावेत. त्यानंतर आपल्या जीवनात शिवशंभूंची आपल्यावर कशी कृपा बरसते याची संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे.
श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे.
मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात असं सुद्धा मानलं जातं.
मित्रांनो श्रावण महिना शिव शंभू ना प्रिय आहे कारण याच महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकर यांना प्राप्त करण्यासाठी मोठं तप केल होत.
आपल्या या पूजेत जलाभिषेक रुद्राभिषेक यांना विशेष महत्व आहे. कोणत्याही कारणाने पूजा करू शकत नसाल तर मनोभावे एक बेलाचे पान आपण भगवान शंकर यांना वहा. शिवलिंगा वर पान अर्पण करा. पूर्ण पूजेचे फळ लाभते.
मित्रांनो रुद्राक्ष धारण करणे हे सुद्धा भाग्याचे ठरते. पूजेत अक्षत म्हणजेच तांदूळचा वापर कसा करायचा ते बघू.
अक्षत याचा अर्थ न तूटलेले तांदूळ. कोणत्याही पूजेत तांदळाचे महत्व अभिन्न आहे. याशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही. टिळा सुद्धा गंध आणि अक्षता चा असतो. आपण विवाहात सुद्धा अक्षता च वापरतो. अक्षत म्हणजे जो धन निर्माण करतो.
माता लक्ष्मी ला सुद्धा हे अक्षत अत्यन्त प्रिय आहेत.
हे कधीच खराब होत नाहीत हे दीर्घायु चे प्रतीक म्हणजेच अक्षत असतात. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.
एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवांना प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावावा. आणि अकरा तांदळाचे दाणे घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक एक करून अर्पण करायचे आहेत.
मित्रांनो प्रत्येक दाणा अर्पण करताना ॐ नमः शिवाय या महा मंत्राचा उच्चार करावा. त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी. तुमच्यावर भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.