नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्याच्या जीवनात काळ कितीही कठीण असुद्या एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या अमावस्येपासून अशाच काहीशा सुंदर काळाची सुरवात तुळ राशीच्या जीवनात होणार असून यांच्या जीवनातील संपूर्ण दुःखाचा अंत होणार आहे. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.
हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या दर्श अमावस्येला विशेष महत्व प्राप्त असून या अमावस्येला दान पुण्य करणे अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले आहे.
कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या अमावस्येला विशेष उपाय केले जातात. शास्त्रानुसार या अमावस्येला पितरांना मोक्ष प्रदान करणारी अमावस्या म्हटले जाते.
मान्यता आहे कि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी श्री गणेश ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करून भगवान श्री गणेशाला लाडूचा नैवैद्य देणे अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले आहे.
धनप्राप्तीसाठी या दिवशी अमावस्येला श्रीयंत्राची विधिवत पूजा करून श्री सूक्ताचा पाठ केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात आणि धनलाभाचे योग जमून येतात.
या दिवशी नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करणे विशेष फलदायी मानण्यात आले आहे. अमावस्येच्या दिवशी सकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मनोकामना पूर्ण होतात.
दिनांक 10 मे च्या रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होणार असून दिनांक 11 मे रोज मंगळवारच्या मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.
पंचांगानुसार 11 मे रोजी चंद्र आणि सूर्य अशी युती होत असून हा संयोग तूळ राशीचा भागोद्य घडवून आणणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून शुभ घटना घडून यायला सुरवात होणार आहे.
आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील वाईट काळाचा अंत होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे.
हा काळ तुळ राशीसाठी अतिशय शुभ ठरणार असून आपल्या जीवनातील हा काळ सर्वात उत्तम काळ ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरु होणार आहे.
आपल्या जीवनातील अपयशाची मालिका आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार असून आपण करत असणाऱ्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.
जीवनातील मानसिक ताणतणाव आणि भयभीतीचे दडपण आता दूर होणार असून जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे.
करियर मध्ये चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून प्रगतीचे दिवस येणार आहेत. अमावस्येचा शुभप्रभाव आणि ग्रहनक्षत्रांची अनुकूलता तूळ राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिस्थिती निर्माण करत आहेत.
आता इथून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीसाठी पोषक ठरणार आहे. मैत्री मध्ये निर्माण झालेला मतभेद आता दूर होणार आहे. उद्योग व्यवसायासाठी आपण करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरणार आहेत.
नव्या जोमाने नव्या कामाची सुरवात करणार आहात. या काळात आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. करियर विषयी आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.
करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून प्रेम प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.
घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट पाहावयास मिळेल. मागील अनेक दिवसांपासून अडकेला पैसा आपल्याला मिळण्याचे योग आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच भविष्य विषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.