नमस्कार मित्रानो
मित्रांनो मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखा मागे एक सूख लपलेलं असतं. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख आणि यातना सहन केल्या नंतर अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते की त्या वेळेपासून मनुष्याचे नशीब चमकण्यास सुरुवात होते.
दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचे सुंदर दिवस येण्यास सुरुवात होते. दिनांक 11 ऑगस्ट पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.
आता आपल्या नशीबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे . जीवनात चालू असणारी निराशाजनक परिस्थिती बदलणार आहे. नकारात्मक काळाचा अंत होणार असून सुंदर आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल .
मित्रांनो मागील काळ आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता असे म्हणायला हरकत नाही. कारण या काळात आपण अनेक दुःख भोगले असतील अनेक अपयश आणि अपमाण पचवले असतील. ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मन उदास बनले असेल. पण आता इथून पुढे परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
अपयशांचा काळ संपून प्रगतीचे दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. आता प्रगतीची सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक 11 ऑगस्ट रोज बुधवार शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत , ते सिंह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहेत. शुक्र याआधी सूर्याच्या सिंह राशी मध्ये होते ते आता बुधाच्या कन्या राशीत गोचर करणार आहेत.
शुक्र कन्या राशि मध्ये दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत राहणार असून त्यानंतर ते तूळ राशीत गोचर करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. जेव्हा शुक्राचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शुक्र हे धनसंपत्ती , भोगविलास , सौंदर्य , शारीरिक सुख , वैवाहिक सुख आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह मानले जातात.
शुक्र जेव्हा एका राशीतून दुसर्या राशीत गोचर करतात तेव्हा संपूर्ण बारा राशीवर याचा प्रभाव दिसून येतो. काही राशीवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो तर काही राशीवर नकारात्मक प्रभाव दिसून येतो . शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशी वर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशींसाठी हे राशि परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे.
आता आपला भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. वैवाहिक जीवनात सुख शांती आणि वैभवाचे दिवस येणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी दूर होणार आहे.
सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्यास सुरुवात होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , मिथुन , सिंह , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.