10 जुलै 2021… आजचे राशी भविष्य… जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस…

0
274

नमस्कार मित्रांनो,

आजचे राशी भविष्य 10 जुलै 2021. मेष रास, वृषभ रास, मिथुन रास, कर्क रास, सिंह रास, कन्या रास, तूळ रास, वृश्चिक रास, धनु रास, मकर रास, कुंभ रास, मीन रास या राशींसाठी कसा असेल दिवस? चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया.

मेष रास : आज आपल्या हातून एखादे चांगले काम होऊ शकते. प्रयत्न करायला मागे पुढे बघू नका. जुन्या सवंगड्यांसोबत दिवस मजेत जाईल. खाण्या पिण्याच्या वेळेवर लक्ष द्या. कौटुंबिक सुख उत्तम लाभेल. विद्यार्थी कामात यश मिळवतील. राजकारणी व्यक्तींना यश निश्चित. आरोग्याच्या तक्रारी सांभाळू शकतात. प्रेमाच्या बाबतीत गोष्ट लग्नापर्यंत जाऊ शकते. शुभ रंग – पिवळा.

वृषभ रास : हातात जे काम आहे त्याकडे आधी लक्ष द्या. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. आंबट चिंबट खाऊ नका. दिवसभर कामात दिवस निघून जाईल. कामाचा व्याप वाढेल. प्रश्न चर्चा करून सोडवा. आज मूड स्थिर राहणार नाही. वायफळ खर्च टाळा. तुमचे काम बघून वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. शुभ रंग – आकाशी.

मिथुन रास : आज दिवसाची सुरवात सकारात्मक ऊर्जेने होईल. आज कामात उत्साह राहील. मनमोकळ्या गप्पा माराल. कुटुंबाची जबाबदारी घ्याल. दिवस उत्तम जाईल. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग राखाडी.

कर्क रास : आजचा दिवस चिंतेत जाईल. मनात चलबिचल सुरु राहील. भावनेच्या आहारी जाऊ नका. खोट्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका. फसवणूक होऊ शकते. सावधानता बाळगणे गरजेचे. जास्त काम केल्यामुळे थकवा जाणवेल. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. ब्ल ड प्रेशर असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगा. शुभ रंग – निळा.

सिंह रास : आज मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. काही तरी नवीन करण्याची कल्पना मनात घर करेल. जवळचे मित्र मैत्रिणी भेटतील. नवीन कल्पना डोक्यात येतील. निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता. धार्मिक कामे कराल. जोडीदाराशी सुसंवाद होईल. शुभ रंग – पिवळा.

कन्या रास : आज कामाचे तीन तेरा वाजतील. वेळ आणि काम यांची प्लॅनिंग करा. वेळ वाया घालवू नका. स्वतःचा फायदा होईल याकडे लक्ष द्या. कामे सुरळीत पार पडतील. रागावर नियंत्रण ठेवा. निर्णय घेता घाई गडबड करू नका. दाम्पत्य जीवनात पार्टनरच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पांढरा.

तूळ रास : आज कमी काम करून नफा जास्त कसा होईल याचा जास्त विचार कराल. समोरील व्यक्तीच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष्य द्या. गोड गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढेल. व्यापारी वर्गाला नफा होईल. हातात पैसा खेळता राहील. हाती पैसा खेळेल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद घालत बसू नका. शुभ रंग – नारंगी.

वृश्चिक रास : नातेवाईकांची गाठ भेट होऊ शकते. तुमच्या विचारांना खतपाणी घातले जाईल. पटकन कोणताच निर्णय घेऊ नका. मित्र मैत्रिणींना दुखवू नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. पती पत्नी मधील नाते मधुर बनेल. शुभ रंग – निळा.

धनु रास : मुलांच्या सुखात सुख शोधाल. जुनी कामे पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते. मित्रांच्या भेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. रुचकर जेवण कराल. जोडीदाराकडून समाधान मिळेल. व्यवसायात मोठे यश संपादन कराल. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. आरोग्य सांभाळा. शुभ रंग – लाल.

मकर रास : स्वास्थ्य संबंधी तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. जमा खर्चाचा हिशोब ठेवा. विश्वास संपादन करा. मीडिया तसेच आयटी मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस असेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – भगवा.

कुंभ रास : आज कामाचा तणाव राहील. मुले चांगल्या बातम्या देऊ शकतात. आज तणाव असला तरी दिवस गप्पा मध्ये घालवा. मनात कोणती गोष्ट ठेवू नका. कोणाला दुखावेल असेल बोलू नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पती पत्नी मध्ये वाद होऊ शकतात. बोलताना तोंडावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – पिवळा.

मीन रास : काम चोख पार पाडाल. जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. पत्नी सोबत खटके उडू शकतात. मुलांच्या विचारांचा मान ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. नंतर पश्चाताप होईल. दिवस धावपळीत जाईल. दाम्पत्य जीवन सोन्याहून पिवळे असेल. एखाद्या नव्या व्यवसायाबद्दल योजना आखाल. शुभ रंग – तांबडा.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here