नमस्कार मित्रांनो,
आज 11 मार्च गुरुवारी महादेवांचा सर्वात मोठा दिवस आहे. आज महाशिवरात्री आहे. भगवान महादेवांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी भगवान महादेव हे आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.
महाशिवरात्री च्या दिवशी जो भक्त मनापासून भगवान महादेवांना हाक मारतो त्याची इच्छा महादेव अवश्य पूर्ण करतात. त्या भक्ताच्या आयुष्यात असलेले सर्व दुख महादेव दूर करतात.
मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की भगवान महादेव तुमच्यावर सुद्धा प्रसन्न व्हावेत, त्यांनी तुमच्या आयुष्यात असलेले संकटं दूर करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात.
तुम्हाला वाटत असेल की महादेव तुमच्या वर प्रसन्न व्हावेत तर ही वस्तू महादेवांच्या शिवलिंगावर ठेवा. महादेवाला ही वस्तू अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा अवश्य सांगा.
मित्रांनो तुम्हाला महाशिवरात्री च्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर सुद्धा ही वस्तू वाहू शकता. पण तुमच्या घरी देवघरात शिवलिंग नसेल तर तुम्हाला हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊनच करावा लागेल.
गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण हा उपाय करू शकता. महिला, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्या एक गोष्ट लागेल, ती म्हणजे 1 रुपयाचा सिक्का. महाशिवरात्री ला सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे घालून आपण देवघरात बसावं. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी.
आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची अष्टगंध, चंदन, आणि अक्षत वाहून पूजा करावी. फुले सुद्धा वाहावीत. मित्रांनो अक्षत म्हणजे न तु ट ले ले फु ट ले ले तांदूळ. अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा करावी.
पूजा केल्यानंतर आपल्या हातात 1 रुपयाचा सिक्का घ्यावा आणि आपल्या मनातील जी सुद्धा इच्छा आहे ती बोलावी. आपल्या आयुष्यात असलेले संकटं, इच्छा, बोलाव्यात.
आपल्या आयुष्यात असलेल्या समस्या महादेवांच्या समोर बोलायच्या आहेत. त्यानंतर तो सिक्का शिवलिंगावर ठेऊन द्यावा. अर्पण करावा.
आपण जो सिक्का शिवलिंगावर अर्पण केला आहे तो महाशिव रात्री च्या पूर्ण दिवस आणि रात्र त्या शिवलिंगावर राहू द्यायचा आहे आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्च ला तो 1 रुपयाचा सिक्का तिथून उचलून घ्यावा. हा सिक्का शुक्रवारी 12 मार्च ला कोणत्याही वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. नदी, समुद्र किंवा तलाव इत्यादी ठिकाणी आपण विसर्जन करू शकता.
मित्रांनो आपल्या जवळपास वाहते पाणी नसेल तर तुम्ही तो सिक्का तुळशीच्या कुंडीत मातीत पुरु सुद्धा शकता. अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्री ला 11 मार्च ला हा उपाय करायचा आहे.
या उपायाने आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आपण जे मागाल ते सर्व मिळेल. फक्त हा उपाय करताना मनापासून, श्रद्धा ठेवून करा.
मित्रांनो महाशिवरात्री ला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.